MAHA-TAIT

Teacher Aptitude and Intelligence Test Syllabus MAHA TAIT 2017

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची असून सदरील चाचणी ही मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात उपलब्ध असेल. सदरील परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. सर्व साधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढीलप्रमाणे पाहता येईल.

घटक एकूण प्रश्न एकूण गुण
1.   अभियोग्यता 120 120
2.   बुध्दिमत्ता 80 80
एकूण 200 200

 

सदरील चाचणी ही एकून २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

अभियोग्यता या घटकामध्ये गणितीय क्षमता, तर्क क्षमता, वेग आणि अचूकता, इंग्रजी भाषिक क्षमता,मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/ व्यक्तिमत्व इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल.

बुद्धिमत्ता या घटकामध्ये आकलन, वर्गीकरण,सांकेतिक भाषा,लयबध्द मांडणी, समसंबंध, कुट प्रश्न, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल. MAHA-TAIT 2017 च्या रेगुलर अपडेट आणि स्टडी मटेरियलसाठी खालील लाल बेल आइकॉनवर क्लीक करुण Allow वर क्लीक करा. तसेच आपले कही प्रश्न व अभिप्राय असतील तर खाली कोमेंट करा.

DOWNLOAD MAHA-TAIT SYLLABUS HERE

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी च्या अधिकृत माहिती साठी महाराष्ट्र शासनाच्या MahaPariksha.gov.in या website ला भेट दया.

Admin

Mahatait.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *