शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (MAHA TAIT) 2022-23
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ब खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
MAHA TAIT Time Table (वेळापत्रक)
- परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थव्ठावर उपलब्ध आहे.
- अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, पदविको, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
- सदर परोक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक दूयावा.
- ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
MAHA TAIT EXAM 2022 Advertisement