Home MAHA-TAIT MAHA-TAIT 2017 Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – Nature and Pattern...

MAHA-TAIT 2017 Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – Nature and Pattern of Exam

1682
3
SHARE

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे बहुपर्यायी वस्तुनिष्ट स्वरुपाची व ऑनलाइन असेल, ज्यामुळे शिक्षक भारती मध्ये भ्रष्टाचार व  व्यतीनिष्ठातेला वाव राहणार नाही. शासनाच्या परिपत्रका नुसार सदरील परीक्षा ही राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये नियोजित परीक्षा केंद्रानवर आयोजित करण्यात येणार आहे. सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची काठीण्य पातळी ठरवून प्रश्नपत्रिकेची रचना करण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे परीक्षा संपल्यावर म्हणजेच पेपर सबमिट केल्यावर त्वरित विद्यार्थ्यांना त्यांचे प्राप्त गुण दिसून येतील. विद्यार्थ्याना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठी ज्यास्तीत ज्यास्त पाच संधी उपलब्ध राहतील. त्यानंतर ही संधी संपुष्टात येईल. याचाच अर्थ  असा कि, विद्यार्थी अधिक गुण संपादनासाठी पाच वेळा संधीचा लाभ घेऊ शकतील. विद्यार्थी सदरील संधीचा लाभ घेऊन ज्या चाचणी मध्ये त्याने  ज्यास्त गुण संपादन केले आहेत. त्याचा वापर तो शिक्षक भरती मध्ये करू शकतो. शासनाच्या परिपत्रकानुसार सदरील परीक्षा वर्षातून किती वेळा होईल हे सांगण्यात आलेले नसले तरी, दोन परीक्षेतील अंतर चार महिन्या पेक्षा ज्यास्त नसावे असे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ असा होऊ शकेल कि, शासन सदरील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे आयोजन वर्षातून दोन किवा तीन वेळा करू शकेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे मध्यम हे मराठी, उर्दू आणि इंग्रजी असेल, विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरते वेळी वरील पैकी एक भाषा मध्यम म्हणून निवडावी लागेल. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा यंत्रणे मार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येईल.
Nature and Pattern of Exam
Questions Based on Teacher Aptitude : 120 (Mark=120)
Questions Based on Intelligence : 80 (Marks=80)
Total Questions = 200
Total Marks = 200
Question Pattern = MCQ
Negative Mark System = No

महत्वपूर्ण अपडेट्स व स्टडी मटेरियल साठी खाली दिलेल्या लाल बेल आइकॉनवर क्लीक करुण Allow वर क्लिक करा.
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी च्या अधिकृत माहिती साठी कृपया संबधित अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here